ब्रेकिंग न्युज (Breaking News)
विजय मा. पाटील (Vijay M. Patil)
Email : breakingnewskop21@gmail.com

प्रकाशक :
मास्टरपीस पब्लिकेशन, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर.
मोबा. : ८९७५५०७५७५ (व्हॉट्सॲप), ९८२३२०२१२१

© विजय मारुती पाटील
३५३, पाटील गल्ली, इ वॉर्ड, कसबा बावडा, कोल्हापूर - ४१६००६
मोबा. : ९८२३२०२१२१

प्रथम आवृत्ती : २०२४
मुद्रक : श्रीपाद ऑफसेट, कोल्हापूर.

मुखपृष्ठ, अक्षरजुळणी : सुधीर देशपांडे | सतीश ढोबळे

किंमत : ₹ १४५/-

पुस्तकाबद्दल माहिती

छापून आलेल्या बातम्या आणि प्रत्येक बातमीभोवती असणारे सामाजिक संदर्भ असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. दैनिक 'पुढारी' , आणि 'महाराष्ट टाइम्स' , या वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या निवडक बातम्यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

पत्रकारितेत मिळालेले पुरस्कार

  पत्रकार योगेश कुलकर्णी युवा पुरस्कार : २००९
  महात्मा गांधी तंटामुक्त गाव प्रथम क्रमांक पुरस्कार : २००९-१०
  व्यंकटेश चपळगावकर स्मृती युवा प्रेरणा पुरस्कार : २०१२
  कोल्हापूर प्रेस क्लबचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार : २०१६
  शाहिद शिक्षण मंडळ फेलोशिप : २०१७

काही सारांश

राजर्षी शाहूंचे ऐतिहासिक संशोधन

राजर्षी शाहूंच्या संशोधनवृत्तीतून साकारलेले टाऊन हॉल उद्यानातील देशातील पहिले हरितगृह आता भंगाराच्या वाटेवर चालले आहे. आरसामहाल म्हणून संस्थानकाळात लोकांच्या कोतुकाची जत्रा अनुभवलेल्या या शाहूंच्या स्पर्शापावन वास्तूच्या संवर्धनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शाहूंच्या संशोधनवृत्तीच्या पुराव्याची ही अनमोल वास्तू करवीरच्या पर्यटनातही ठळक करणे गरजेचे आहे. ज्या काळात हरितगृह ही संकल्यना संशोधकांच्या गावीही नव्हती, म्हणजे १९०१ साली कोल्हापुरात शाहूंच्या कल्यकतेतून भवी बनावटीचे हरितगृह तयार झाले.

न्यायासाठी नानूबाईची आर्त हाक

काल सकाळपासून त्यांनी पाण्याशिवाय काहीच घेतलेले नाही... त्या उपोषणास बसल्या आहेत... वय वर्ष सत्तर... घरचा आधार नाही... अशिक्षित असूनही हातात कागदाच्या भेंडोळ्या... जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या चकरा चालू आहेत. त्यांच्या बोलण्याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्या थकून पुन्हा उपोषणस्थळी येतात. उन्हाच्या तडाख्यात छत्रीच्या आधाराने बसतात. 'या म्हातारीला कुणी न्याय देईल का न्याय ?' अशी आर्त हाक जणू त्यांच्याच रूपाने प्रशासनाला देत आहे. कागल तालुक्यातील बोरवडे गावाच्या नानूबाई कृष्णा साठे यांची ही कथा...

भय इथले संपत नाही...

शाहूपुरीतील सहा तरुण कोकणात सहलीसाठी गेले होते. त्यावेळी ते एका सुनसान घरात दोन दिवस राहिले. सहल एन्जॉय केली. कॅमेऱ्याने फोटोसेशन केले. इथंपर्यंतचा सगळा युथ एन्जॉय ठिकठाक पार पडला. ते तरुण कोल्हापुरात परतले. संबंधित तरुणांनी फोटोंची प्रिंट काढली असता प्रत्येक फोटोत एक डोळा नसलेली तरुणी त्यांच्या मागे म्हणे आपोआप प्रकटल्याचे दिसून आले. तरुण भीतीने गांगरले. दोघे रुग्णालयात, एक कोम्यात. या तरुणांसह भूत तरुणीचे छायाचित्र शहरांतील तरुणाईच्या मोबाईलवर हातोहात पसरले.

विजय पाटील

विजय पाटील हे दैनिक पुण्यनगरीचे मुख्य रिपोर्टर आहेत. पत्रकारितेतील त्यांच्या अनुभवामुळे त्यांनी समाजातील विविध मुद्द्यांवर सुसंगत आणि तपशीलवार रिपोर्टिंग केली आहे. त्यांच्या कामामुळे महत्त्वाच्या बातम्या आणि घटना वाचकांसमोर आली आहेत. विजय पाटील हे पत्रकारिता, लेखन, आणि संपादन क्षेत्रात तज्ज्ञ असून त्यांच्या गुणवत्तेच्या रिपोर्टिंगने वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • नाव : विजय पाटील
  • पत्ता : ३५३, पाटील गल्ली, इ वॉर्ड, कसबा बावडा, कोल्हापूर - ४१६००६.
  • पिन कोड : ४१६००६
  • फोन :

    ९८२३२०२१२१

संपर्क साधा

पत्ता

३५३, पाटील गल्ली, इ वॉर्ड, कसबा बावडा, कोल्हापूर - ४१६००६

ई-मेल ऍड्रेस

ई-मेल पाठवा...

वेबसाईट

Breaking News